शोध कवितेचा
शोध कवितेचा सांगावा कुणी कसा?
मौनातून जन्मते आतला हुंकार जसा
पाझरते कधीतरी ओघळत्या नेत्रातून
प्रलयासही दु:ख होईल ओघळ असा
प्रेमात तर खुलते, बहरतेच ती कायम
चारोळी, रुबाई, गज़ल वेगळाच ठसा
सहज सांगते विरश्री ती पोवाड्यातून
ओवी अभंगातून भक्तीभाव तो खासा
रात्रंदिवस अहर्निश कधीही ती स्फुरते
काय वर्णावे कौतुक शोध घ्यावा कसा
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९