असे अचानक कुण्या वळणावर ,
असेल कुठे सुख,शांतीचे आगर ,
आस एकच ही मनी धरून आलो ,
आयुष्य रिकामेओढीत इथवर #
फुले सुगंधीत कुणी सारीच नेली ,
निर्माल्यानेओंजळ अशी भरली ,
वाट रुक्ष अन कितीही काटेरी ,
तरीही तुडवीत आलो इथवर #
जखमांचा जरी किती सुकाळ झाला ,
ठेविले अडवून इथे वनव्याला ,
क्षण ते दुराव्याचे आले ऊभारून ,
जरी एकला तरी आलो इथवर #
किती जपले तरी हरवले सारे ,
मस्तकी शिरले अहंकाराचे वारे ,
हिशेबात जरीही आता न ऊरलो ,
घेऊन सोबतीला आलो इथवर #
दूरवर आलो मन थकले आहे ,
थांबून इथेच वाट पाहणे आहे ,
स्वप्ने हरवली अनेक आजवर ,
शोधीत सुख दु:ख आलो इथवर ##
अशोक मु. रोकडे .
मुंबई .