Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: Atul Kaviraje on June 29, 2023, 04:05:52 PM

Title: बकरी ईद-चारोळ्या-1
Post by: Atul Kaviraje on June 29, 2023, 04:05:52 PM

                                    "बकरी ईद"
                                   ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही चारोळ्या.

     बकरी ईद, हा जगभरातील मुस्लिमांनी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. दिनांक 29 जून 2023 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे.

     तुमच्या प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा पाठवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही डाउनलोड करण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश आणि HD प्रतिमांचा संग्रह संकलित केला आहे. या खास प्रसंगाचा आनंद आणि आनंद पसरवण्यासाठी हे संदेश आणि प्रतिमा तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह सामायिक करण्यासाठी योग्य आहेत. तुम्ही जवळ असाल किंवा दूर, या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना या सणासुदीच्या दिवशी नक्कीच प्रेमळ आणि आठवणीत ठेवतील.

=========================================
"अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,

तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा,

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा...

ईद मुबारक!"


ईद घेऊन येई आनंद

जोडू मनामनांचे बंध

सणाचा हा दिवस खास

ईद मुबारक तुम्हा सर्वांस

बकरी ईद मुबारक!


"बंधुत्वाचा संदेश देऊया,

विश्व बंधुत्व वाढीस लावूया,

बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा...

ईद मुबारक!"


"धर्म, जात – पात यापेक्षाही

मोठी असते शक्ती माणुसकीची...

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात रमझान ईदची...

ईद मुबारक!"


सर्व मुस्लिम बांधवांना,

बकरी ईद च्या हार्दिक शुभेच्छा...

ईद मुबारक!


"तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,
तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो,
सर्वाना बकरी ईद च्या मनापासून शुभेच्छा!"
=========================================

--by adminMV
----------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी वर्ग.इन)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================