II गुरुपौर्णिमा II
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरु-पौर्णिमेवर काही चारोळ्या.
गुरुपौर्णिमा चारोळ्या--
गुरू असतो ध्यास कीर्तीचा...
गुरू असतो श्वास पूर्तीचा....
गुरू असतो मार्ग यशाचा...
गुरू असतो किरण आशेचा..!!
गुरू असतो सुगंध सत्कार्याचा..
गुरू असतो वारा औदार्याचा...!
गुरू असतो जबाबदारीचा सागर..
गुरू असतो जाणिवांचा जागर....!
गुरू असतो अधिकाराचे अधिष्ठान
गुरू असतो सद्विचारांचे प्रतिष्ठान...!!
--DRx Chakradhar.S.More
-----------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी महिला.कॉम)
-------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार.
=========================================