II गुरुपौर्णिमा II
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरु-पौर्णिमेवर काही कविता.
"गुरुचे महत्त्व !!"
----------------
गुरू करीत
असे सर्वां साक्षर
गुरू भासे
जणू परमेश्र्वर
गुरू विना
जरी नाही मोक्ष
तोचि ठेवी
शिष्यांवर लक्ष
बालपणी आईची
ती अमृतवाणी
बोल तिचेच
तर होते कानी
बोल बोबडे
बाल बोलणी
सहज शिकवली
मंजुळ वाणी
नाही उमगलो
नाही समजलो
बोट धरून आईचे
कधी चालू लागलो
गुरु म्हणून
आईच खरोखरी
आईची ही
किमया न्यारी
तरूणपणी ते
होते गुरूकुल
विद्यालयातील ते
गुरुवर्य अनुकूल
शिकवत होते
विषय ही सगळे
ज्ञान अगाध
मज दिले आगळे
गुरू जनांना
मी वंदन करितो
मोल तयांचे
जीवनी मानतो
--प्रशांत कदम
-------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
-----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार.
=========================================