*सध्या*
कोणीच कोणाला ओळखत नाही सध्या
हक्काचे असूनही कोणी बोलत नाही सध्या
मी असाच होतो असाच राहील शेवट पर्यंत
पण जे मनात आहे ते कोण सांगत नाही सध्या
काय चूकलं असेल जवळीक साधून सगळ्यांशी
एकटाच शेवटी तरी दुःख मी मांडत नाही सध्या
समजून घेणारे कोणी नाही असेल ही चूक माझी
मोकळ्या वाटेवर ही कोणी सांभाळत नाही सध्या
दुःख काळजावर किती आहे सांगू कुणाला मी
वाट चुकलेल्याला कोणी वाट दाखवत नाही सध्या
एक फुलपाखरू माझ्या आयुष्यातले होते कधी
ते फुलपाखरू ही आता देहावर भटकत नाही सध्या
असो हरकत नाही तो तिरस्कार ही घेतो खांद्यावर
तरी तिरडीला माझ्या कोणी हात लावत नाही सध्या
कविराज..अमोल...
मो.७८२८८९५५५५..अहमदनगर