Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: mkapale on July 24, 2023, 01:52:15 PM

Title: नशीब
Post by: mkapale on July 24, 2023, 01:52:15 PM
नशीब

तुला दूर करतांना,आला पाऊस आसवांचा
भविष्याचे स्वप्न तुझे, मज प्रश्न रोज भुकेचा

प्रेमात जाऊया भिजुनी तुझा हट्ट नेहेमीचा
वर्षाव घडवेल का तो जन्म मातीत अंकुराचा

कसा पेलू मी भार, सांग तुझ्या काळजीचा
थकून जातो शिवण्यात , आकार झोपडीचा

म्हणे तुझ्या रूपे येईल पाय तो लक्ष्मीचा
कसे समजाऊ तुला खेळ हा नशिबाचा