तू गझल
आज वाटलं लिहावं काही खट्याळ
मग तुझा लाजरा चेहेरा आठवला
पाहून तो मीच होतो पाणी पाणी
म्हणून तो विषय तिथेच संपवला
नाजूक अलवार देखणी झालेत वापरून
शब्दही झाले पाहून अवाक तुला
तुला घडवून त्याचाही गेला असेल तोल
आणि मग तुझा साचाच फुटला
विश्वास नव्हता माझा नशिबावर कधी
तुझ्या होकाराने माझाही नाईलाज झाला
मिरवावे घेऊन तुला पाहत नजरांत स्तुती
कि वाचवावे प्रत्यके नजरेपासून तुजला
काळजाचा ठोका चुकणे वगैरे वगैरे
शब्दप्रयोग आता अचूक उमजला
तुला जपायचे आहे ह्या जबाबदारीने
आता पुरुष माझ्यातला खंबीर बनला