चंद्र होशील का?
संपलेले सूर हे तरी
संगीत तू देशील का?
मूक झाले शब्द हे तरी
गीत तू गाशील का?
शिणलेले नेत्र हे जरी
तू आता येशील का?
वाट अवघड ही परी
साथ तू देशील का?
खंत ही मम अंतरी
दूर तू करशील का?
तहानलेली मी चकोरी
चंद्र तू होशील का?
------------
hmmmm
chan aahe
THANQ Nilam.pl.read my ganbhir kavita.u may like.
Khupch chan ;)
thanq sulu--!