Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Atul Kaviraje on August 15, 2023, 11:30:29 AM

Title: भारताचा स्वातंत्र्य दिवस-कविता-6
Post by: Atul Kaviraje on August 15, 2023, 11:30:29 AM
                                "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही कविता.

                      स्वातंत्र्य दिन कविता मराठी 2023--

           मी माझा भारत ..!--

मी स्वतंत्र ,मी स्वतंत्र ,मी स्वतंत्र आहे
आनंदाने मी स्वातंत्र्याचे गीत गात आहे।।धृ।।

काय दिले मज देशाने
ते पहात आहे
मोकळ्या श्वासाचे मी
जीवन जगत आहे....।।१।।

पोटभर भाकरी
मी खात आहे
अंगभर कपडा
अंगावर घालत आहे...।।२।।

निवारा मायेचा मजला
मातृभूमीच्या कुशीत मिळत आहे
विचारांना माझ्या येथे
मोठे मानक लाभत आहे....।।३।।

उज्वलतेचा केशरी मनोहर
सात्विकतेचा सफेद खरोखर
सम्पन्नतेचा हिरवा घेऊन पहा
अशोक चक्रांकित तिरंगा नभी फडकत आहे।।4।।

तिरंग्याला घेऊन हाती
देश छाती फुगवत आहे
स्वातंत्र्याचे गीत सुंदर गाता
सारे ब्रम्हांड कौतुकाने पहात आहे।।५।।

अभिमान मला माझ्या देशाचा
मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे
स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले
त्या सर्वांना मी मानवंदना कृतज्ञतेची देत आहे.।।६।।

मी स्वतंत्र मी स्वतंत्र मी स्वतंत्र आहे
आनंदाने मी स्वातंत्र्याचे गीत गात आहे।।धृ।।

--कवी – प्रशांत शिंदे
-------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑर्डर.इन)
                        -----------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================