Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: बाळासाहेब तानवडे on October 24, 2010, 12:20:16 AM

Title: प्रेमासाठी ......
Post by: बाळासाहेब तानवडे on October 24, 2010, 12:20:16 AM

    प्रत्येकाला हवा हवासा
अमूल्य सुंदर जन्म देता.
बालपणीच्या कोवळ्या स्वप्नांना,
सप्तरंगी रंग देता.

जीवापाड जपताना ,
सुख - दु:खाना अतूट साथ -संग देता.
शिक्षण देऊन मोलाचं,
भावी सुख स्वप्नात तुम्ही दंग होता.

तारुण्याचा बहर सावरताना,
भविष्याची सुखस्वप्ने न्याहाळताना.
अचानक प्रेम स्वरूप समोर येते ,
मग आमच्या स्वप्नांना सत्य रूप येते.

प्रेमाचा अंकुर मोहरतो ,
प्रेमाचा वसंत बहरतो.
मग एक दुसऱ्या वाचून न जगण्याच्या,
अणाभाकांचा, कहर होतो.

ना जातीला स्थान असतं ,
ना धर्माचं भान असतं .
प्रेमाच्या अमूल्य क्षणासाठी ,
आमच जीवन सार गहाण असतं.

तुमच्या अन गणगोतांच्या विरोधाला,
तलवारीची धार असते.
विलग न होण्याचे धैर्य,
सर्व कक्षांच्या पार असते.

नकळत पुढच पाऊल टाकून बसतो ,
परतीचा मार्ग सर्व बाजूने खचतो.
तेंव्हा गरज असते तुमच्या खंभीर साथीची,
साथ हवी असते सार्थ विश्वासाची.

तेंव्हाच तुम्ही पाठ फिरवता ,
नात्याची घट्ट गाठ निरवता.
समाजाच्या निरर्थक भीतीपोटी ,
जपलेल्या अतूट नात्याला क्षणात पूर्ण विराम देता.

असे किती दिवस चालत राहावे.
पोटच्या गोळ्यांना जितेपणी मारत राहावे.
मागच्यानी केले तेच परत करत रहावे.
संकुचित वर्तुळात फिरत रहावे.

म्हणून जाती -धर्म भेद दूर सारा,
गढूळ मनांना शुद्ध प्रेमाने भरा.
माणुसकी हाच मुळ धर्म आपला ,
ज्याने समानता सद्गुण जपला.


कवी : बाळासाहेब तानवडे

© बाळासाहेब तानवडे २३/१०/२०१०

टीप : ही मुलीची कैफियत आहे. पालकांची कैफियत  माझ्या " वादळ" या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे . वादळ कवितेची लिंक  खाली  देलेली आहे.
http://marathikavita.co.in/index.php/topic,4408.msg13984.html#msg13984 (http://marathikavita.co.in/index.php/topic,4408.msg13984.html#msg13984)


http://marathikavitablt.blogspot.com/ (http://marathikavitablt.blogspot.com/)
Title: Re: प्रेमासाठी ......
Post by: santoshi.world on October 30, 2010, 12:54:20 PM
दोन्ही कविता आवडल्या तुमच्या  ...... आई-बाप आणि मुलगी दोघांच्याही मनातील कैफियत योग्य रीतीने मंडळी आहे तुम्ही दोन्ही कवितां मध्ये ............... दोघे हि आप-आपल्या ठिकाणी योग्य असतात ........... समाज नावाचा व्हिलन दोघांच्या हि आयुष्याची माती मोल  करून टाकतो ........... जमलं तर ह्या कवितेखाली तुमच्या वादळ कवितेची लिंक दया  ....... आणि वादळ कवितेखाली ह्या कवितेची लिंक  ........ म्हणजे वाचकाच्या वाचण्यात दोन्ही कविता एकाच वेळी येतील ............. लिखाण छान आहे तुमचे ........ असेच लिहित रहा आणि पोस्ट करत रहा ........ :)
Title: Re: प्रेमासाठी ......
Post by: बाळासाहेब तानवडे on November 14, 2010, 12:55:41 PM
संतोषीजी  ,
तुमच्या अभिप्रायाबद्दल अत्यंत आभारी आहे. तुमच्या बहुमुल्य सुचानांच पालन करेन.