मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, पावसाची एक आगळी वेगळी विरह कविता-गीत ऐकवितो. "रिम झिम बरसतI बIहर ये पानी, अंदर आग लगी हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस ऑगस्ट महिन्याची ही ढगाळलेली परंतु क्षितिजावरून केशरी रंगाचा प्रकाश फाकणारी, बुधवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-( रिम झिम बरसतI बIहर ये पानी, अंदर आग लगी हैं )
---------------------------------------------------------------
"बाहेर रिमझिम पाऊस पडतोय, देहाला, मनाला जाळून जातोय"
--------------------------------------------------------
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
हा पाऊस नेहमीसारखा नाही,
तप्त, दग्ध, जणू दाहक भासतोय
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
पर्जन्य शीत-पाणी आग का लावतय ?,
उडणारे थंड-तुषार अंग का पोळतय ?
तनामनात जणू वणवIच पेटलाय
झरत्या पावसात तो अIणिकच पसरलाय
पाऊसही ही आग विझवू शकत नाही,
इतका त्याचा निखारा तप्त झालाय
शरीर एका अपुऱ्या जाणिवेने तडफडतंय
मन एका आशेने, निराशेत तळमळतंय
ही तृष्णा अशीच वाढत जाणार ?,
मी कायमच का अशी अतृप्त राहणार ?
माझी ही तहान कशी भागणार ?
माझी ही अनबूझ प्यास अशीच वाढत राहणार ?
कदाचित याच आगीत तिचे निवारण होईल,
कदाचित हाच पाऊस ती विझवू शकेल
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
हा जाचक अनुभव नव्हता कधी आला,
मग आताच देह इतका का पेटून उठला ?
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
याचे कारणही मला नाहीय कळत,
याचे निवारणही मला नाहीय उमजत
पावसाचा थेम्ब मला बोजड वाटतोय
पावसात चालणेही मला अवघड होतेय
एरव्ही आनंद देणारे हे पावसाचे पाणी,
दुःखाने माझ्या शरीराला इतके का पोळतेय ?
लक्षात येतंय आता मला, हे दुःख विरहाचे आहे
उमगलंय मला, हा मनस्ताप सारा जुदाईचा आहे
हे गणित प्रेमाचे आहे, जे सुटतI सुटत नाही,
पियाच्या फIरकतीचे दुःख मनाला अतीव जाचत राही
याच पावसात आमचे प्रेम जमले होते, मन जुळले होते
परस्पर प्रेम निभावण्याचे वादेही खूप झाले होते
पण ते प्रत्यक्ष निभावता नव्हते आले, काहीतरी वितुष्ट आले,
विरहाचे हे दुःख अवचित माझे मन अनुभवत राहिले
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
माझा पिया परतुनी कधी येईल,
देह सारा त्याच्या प्रतीक्षेत झिजतोय
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
पाहता पाहता प्रेमाचा सारा विचका झाला,
प्रेमभंगाचा हा आघात मनाला क्षत विक्षत करून गेला
पियाचे निघून जाणे, आणि आमची ताटातूट
माझ्या मनावर दुःखाचा आघात करून गेला
हा पाऊसही तेव्हा काही करू शकला नाही,
तो फक्त पडत राहिला, पहIत राहिला
त्या किनाऱ्यावर माझे प्रेम उभे होते
मी या किनारी असहाय्य राहिले होते
मध्ये अथांग सागर हिलोरे घेत होता,
आमच्या प्रेमाची परीक्षा तो घेत होता
ही भक्कम, मजबूत भिंत मध्ये उभी होती
ही काचेची तटबंदी आरपार दाखवत होती
पण माझं प्रेम मला मिळवता आलं नव्हतं,
दिसतं होतं, तरीही ते दूरच राहीलं होतं
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
त्याची तीव्रता दाहकता जाणवू लागलीय,
पियाच्या नसण्याची उणीव भासू लागलीय
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
पाऊस मला असाच दुःख देत रहाणार का ?,
माझे प्रीतीचे गाणे असेच अपूर्ण राहणार का?
आज या विरहाने माझी दैनावस्था केली आहे
या ताटातुटीने मी जणू उद्ध्वस्त झाले आहे
माझे आयुष्य विराण, भकास, उजाड झाले आहे,
नैराश्यच आलय, आशेचा किरणही काळवंडला आहे
आता ही दूरी कोण मिटविल, हे अंतर वाढत चाललंय
माझे प्रेम मला कोण मिळवून देईल, मन माझ कुढत चाललंय
माझा प्रेम दुरावलंय, जीण माझं मुश्कीलच झालंय,
अIशा साऱ्या मावळत चालल्यात, अIशेच घर नजरेआड झालंय
बस आता असंच जीवन जगायचं, विरह सहत राहायचा
गतकाळातल्या त्या आठवणींचा झुला झुलत ठेवायचा
पियाच्या परतीच्या प्रतीक्षेत देह झिजवत ठेवायचा,
पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेम्ब अंगावर झेलत राहायचा, सोसत राहायचा
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
मनाला समाजविलय मी, तुझे दुःख आयुष्यभराचे आहे,
असा उदास राहू नकोस, सुखाचा दिवस यायचा आहे
बाहेर रिमझिम पाऊस पडतोय
देहाला, मनाला जाळून जातोय
आता हा पाऊसच माझा सखा, माझा सोबती,
पडतI पडतI दुःखावर माझ्या तोच फुंकर घालतोय
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2023-बुधवार.
=========================================