मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, पावसातली एक सुंदर प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मै कितना खुशनशिब हू तू मेरी मेहबुबा है, मै कितनी खुशनशिबा हू तू मेरा दिलरुबा है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही छान ऊन पडलेली, गIर पवन वहIत असलेली, पाऊस नसलेली, बुधवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-( मै कितना खुशनशिब हू तू मेरी मेहबुबा है, मै कितनी खुशनशिबा हू तू मेरा दिलरुबा है )
-------------------------------------------------------------------
"मी तुझा मेहबूब, तू माझी दिलरुबा, माझा आज माझ्यावर नाहीय ताबा"
--------------------------------------------------------------
मी तुझा मेहबूब, तू माझी दिलरुबा
माझा आज माझ्यावर नाहीय ताबा
देखणे रूप तुझे मला मोहित करतंय,
मोहक अदा तुझी मला प्रेमात पIडतेय
मी तुझा मेहबूब, तू माझी दिलरुबा
माझा आज माझ्यावर नाहीय ताबा
लाखातून एक तू मी तुला निवडलंय,
कित्येकदा स्वप्नातही मी तुला पाहिलंय
तुझं सौंदर्य आहेच तसे वेड लावणारे
तुझे लावण्य आहेच तसे मन मोहणारे
अस्मानी परी, तू रूपाचा खजिनाच आहे,
ज्याच्या पदरी पडशील तो नशिबाने राजा आहे
मी किती खुशनशिब आहे, तू मला मिळालीस
मी किती नशीबवान आहे, तू माझी झालीस
दिलरुबा, मी तुला कधीच अंतर देणार नाही,
तुझा हा मेहबूब तुला कधीच दूर ठेवणार नाही
लाडक्या, तू माझी मोहब्बत आहेस, तू माझा सनम आहेस
सख्या, तू माझा मसीहा आहेस, तूच माझा खुदा आहेस
माझ्या नशिबानेच तू मला प्राप्त झालास, तुझं प्रेम मला मिळालं,
मला तू हो म्हटलंस, प्रेम दिलंस, इतकं का मी पुण्य केलं ?
साजणा, तू माझा दिलरुबा आहेस, मी तुझ्यावर मेहरबा आहे
रमणा, तू माझा प्रियकर आहेस, तूच माझा जिवलग सखा आहेस
इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर, इतकं का झुरतोस माझ्यासाठी ?,
मी नाही दिसले की, तळमळतं, हळहळतं तुझं मन फक्त माझ्यासाठी ?
हे प्रेम असंच असतं सखे, ही प्रीत अशीच असते, लाडके
आपण प्रेमात इतकं बुडून गेलोय, एकमेकांचे होऊन गेलोय
आपलं हे प्रेम अमर आहे, ते कधीच मरणार नाही,
आपलं हे प्रेम अजर आहे, अक्षय आहे, ते कधीच कमी होणार नाही
आपण नसू, पण आपलं प्रेम चिरकाल टिकेल, कायम राहील
मी नसेन, तू नसशील, पण आपलं प्रेम शाश्वतच राहील
पुन्हा पुढील जन्मात तूच मला भेट, तुझीच साथ मला कायम मिळावी,
त्यापुढचा जन्म, आणि कित्येक जन्म, तुझी माझी जोडी युगानुयुगे टिकावी
आपल्या प्रेमाचा श्रीगणेशा सखये तूच केला होतास सुरु
बीज रुजून प्रेमाचे, अंकुरलेला वृक्ष लागला होता बहरू
मी तुझ्यावरच प्रेम केलं होत, राणी, माझ्या नजरेत नव्हतं दुसरं कोणी,
तूच होती माझी राधिका, तूच सारिका, तूच प्रेमिका, तूच माझी रमणी
हे प्रेम जसं सुरु झालं तसंच ते चिरकाल टिकेल का ?
आपण जरी हयात नसलो तरी त्याचा विनाश होईल का ?
ही प्रेमाची कहाणी आपली अधुरी राहील, इथेच संपेल का ?,
तुझ्यापासून सुरु झालेलं हे प्रेम, तुझ्याकडेच येऊन थांबेल का ?
माझी सारी हयात प्रिया, तुझं प्रेम मिळविण्यासाठी निघून गेली
या बुंद बुंद प्रेमासाठी, माझ्या आयुष्याची बरीच वर्षे वाहून गेली
आज आपल्या प्रेमाची घटI बरसतेय, ती झुमतेय, गातेय, नाचतेय,
आपलं प्रेम आपल्याला हाक देतंय, बोलावतंय, तुला ती ऐकू नाही अIली ?
आज नशिबाने आपल्याला एक केलंय, आज तकदीर आपल्यावर मेहरबान आहे
आज आपल्या प्रेमाने आपणास एकत्र आणलंय, या प्रेमाचे आपल्यावर कर्ज आहे
ये प्रियकरI, माझ्या जवळ ये, खूप दिवसांनी तुला मी पाहतेय, मला कवेत घे,
ये दिलबरI, माझ्या समीप ये, वाट पाहून थकून गेले होते मी, मला तुला नीट पाहू दे
युगानुयुगे तुझी वाट पहिली, तेव्हा तू कुठे मला मिळालास
वर्षानुवर्षे तुझी प्रतीक्षा केली , तेव्हा तू आज माझा झालास
मनाने तुलाच होत वरलं, तुझं प्रेम मला मिळालं, तुझं मन आज माझं झालं
आज मी तुला मिळवून धन्य झाले, आज माझं प्रेम जिंकलं
आता तू आला आहेस, मला जीवनभर साथ दे, मला तुझा हात दे
तुझ्याबरोबर आयुष्यभर राहीन मी तुझी होऊन, माझं वचन तू घे
या जीवनाचा काहीही भरवसा नाही, मला फक्त तुझ्यावरच यकीन आहे,
तुझ्याबरोबर राहण्याची मजा काही और आहे, हे जीवन खूप हसीन आहे
आपल्या प्रेमात आता काही वितुष्ट नको येऊ दे, विघ्न नको येउदे
सारा जमाना आपल्या विरुद्ध गेला, तरी आपले प्रेम एक होऊ दे
दुनियेची रस्म रिवाज, रूढी परंपरा साऱ्यानI तोडेन मी आपल्या प्रेमासाठी,
सप्त पर्वत लांघून, ही दूरी दूर करून, मी कशीही येईन तुला भेटण्यासाठी
मी तुझा मेहबूब, तू माझी दिलरुबा
माझा आज माझ्यावर नाहीय ताबा
नशिबाने तू मला मिळालीस, मी खुशनशिब आहे,
तुझ्या प्रेमाने मला नव जीवन दिलं, मी तुझा ऋणी आहे
मी तुझी दिलरुबा, तू आहेस माझा मेहबूब
मी तुझी साजणी, प्रिया तू आहेस माझा साजणा
फार यत्नांनी तुला मी मिळवलंय, सारं सारं त्यागून,
ईश्वराकडून तुला आणि तुझं प्रेम घेतलंय मागून
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार.
=========================================