मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, पावसातील एक अनोखी प्रेम कविता-गीत ऐकवितो. "तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, जो होश था, वो तो गया"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पाऊस नसलेली, परंतु मळभ दाटलेली आणि मन उत्साहित करणारी सुंदर, शुक्रवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-( तुम्हें जो मैंने देखा, तुम्हें जो मैंने जाना, जो होश था, वो तो गया )
------------------------------------------------------------------------
"पाहता तुला मी हरवून गेलो, तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो"
--------------------------------------------------
पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
नकळत प्रेम जडले माझे तुझ्यावर,
तुझ्या प्रीतीच्या स्वप्न-सागरात पोहत राहिलो
पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
तुझ्या प्रीतीच्या धुंद, मंद जलधारांमध्ये,
मी चिंब ओला न्हाऊन निघालो
प्रेमबीज मनात खोल रुजू लागलं
प्रेमांकुर हळू हळू पल्लवित होऊ लागलं
माझ्या प्रेमाला आकार येऊ लागला,
तुझ्या प्रेमाचा मला साक्षात्कार होऊ लागला
तुझ्या प्रेमाची नशI मला चढत आहे
ही धुंदी क्षणोक्षणी वाढत आहे
मी असा कसा तुझ्या प्रेमात दिवाणI झालो ?,
याचे कोडे मला आजही पडलेले आहे
तुझं बदन महकत आहे, त्याची खुशबू भिनत आहे
तनुत पसरलेला तुझा सुगंध, अंतर्मन शोषून घेत आहे
माझा माझ्यावर नाही ताबा, मन बेकाबू होत आहे,
याचं धुंदीत माझे मन बहकत आहे, पाऊल भरकटत आहे
माझ्या विचारांच्या पलीकडे तुझं स्थान आहे
माझ्या जाणिवांच्या पलीकडे तुझं ठिकाण आहे
असं काय आहे तुझ्यात, मला जे मजबूर करतंय ?,
असं काय आहे तुझ्यात, मला तुझ्या प्रेमात पIडतंय ?
पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
माझे अजाण मन तुला जाणत राहिले,
तुझ्या प्रेमात मी नकळत ओढला गेलो
पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
सुध, बुध केव्हाच हरपली होती माझी,
सारासार विवेकही माझा मी हरवून बसलो
तू इतकी खूबसूरत का आहेस, सुंदर का आहेस ?
या प्रश्नाने साऱ्यांना हैराण, चकित, थकीत केलं आहे
या जगIत मानव रूपात पऱ्याही राहतात आजही,
तुझं अस्मानी रूप पाहून साऱ्यांच्या नजर विस्फारित आहेत
तरीही तू इतकी साधी आहेस, इतकी भोळी आहेस
आधीच तू इतकी कमसीन आहेस, हसीन आहेस
तू नटत नाहीस, थटत नाहीस, तुझे सौंदर्य नैसर्गिक आहे,
जो पाहतोय तुला, तो पाहून मोहित होत आहे, गुमसुम होत आहे
पहा त्या इतरांप्रमाणे मीही तुझ्यात गुंतत राहिलोय
पहा त्या साऱ्यांप्रमाणेच मीही तुला पहIत राहिलोय
मी बहकत राहिलोय, मी बरळत राहिलोय, मी बेधुंद झालोय,
मी तुझ्या प्रेमात वेडा झालोय, मी तुझ्या प्रीतीत पागल झालोय
माझ्या मन-मंदिरातील तू तीच प्रेम-मुरत आहेस
जिला मी आजवर पूजित होतो, अर्चना करीत होतो
माझ्या मन-गाभाऱ्यातली तू तीच प्रेम-देवता आहेस,
जिची मी आरती गात होतो, जिचे स्तवन करीत होतो
पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
तुझ्या प्रेमाचा रंग मला लागलाय, सखे,
या प्रेम-रंगात मी नखशिखांत रंगून गेलो
पाहता तुला मी हरवून गेलो
तुझ्या प्रेमात मी बुडून गेलो
तो क्षण माझ्या अजुनी आहे स्मरणी,
जेव्हा तुला मी माझं दिल देऊन बसलो
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.09.2023-शुक्रवार.
=========================================