मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, चिंब पावसातील एक भिजलेली प्रेम कविता-गीत ऐकवितो. "मौसम है भिगI भिगI रे, छाये मन पे जाने कैसा नशI रे"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही सतत पाऊस पडत असलेली, शांत, मंद वIरI वाहत असलेली, निसर्ग-रम्य अशी, शनिवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-( मौसम है भिगI भिगI रे, छाये मन पे जाने कैसा नशI रे )
------------------------------------------------------------------
"मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा, चिंब भिजून धुंद होण्याचा"
--------------------------------------------------------
घाबरू नकोस,प्रिये, हे सगळॆ संकेत तर त्या पावसाचे आहेत
काळजी करू नकोस, सखे, हे सारे सूचक त्याच्या येण्याचे आहेत
ही सारी त्या पावसाची लक्षणे आहेत, हे सर्वजण पावसाची पूर्वसूचना घेऊन आले आहेत,
थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल, हेच त्याचे दूत आपणास सांगत आहेत
बरं झालं, या सर्वांना घाबरून का होईना तू माझ्या मिठीत आलीस
छान वाटलं, निसर्गाच्या या रौद्र-रुपाला घाबरून तू माझ्या बाहुपाशात आलीस
या ढगांचा, या घटांचा, या वाहत्या वाऱ्याचा मी शतशः ऋणी आहे,
आम्हा दोघांना पुन्हा एक करणाऱ्या, त्या पावसाचाही मी आभारी आहे
हा निसर्ग काही सांगतोय, हा पडणारा पाऊस काही बोलतोय
ही घटI काही सूचित करतेय, हा अवखळ वIरI काही संकेत देतोय
अगं, त्या निमित्ताने तू मला मिळालीस, तुझं प्रेम मला मिळालं,
अगं, त्या कIरणे दोन देह एक झाले, तुझं मन माझं झालं
पावसाने तुला आज पूर्ण भिजवलंय गोरी, तुझ्यासह करतोय तो खोडी
किती मोहक दिसतेस तू, बघ अंगाशी घट्ट चिकटून राहिलीय तुझी साडी
हे तुझे ओलेते रूप मला जणू नशI देतंय, मनात व्यापून राहिलीय अनोखी गोडी,
ये समीप ये, माझ्या मिठीत ये, नाहीतर या थंडीने भरेल तुला हुडहुडी
तुला चांगलीच ओळखतेय मी बरं का, लावू नकोस मला लाडीगोडी
असं वाटतंय मला आज, तुझी नियतीच आहे खराब, खोटारडी
तुझ्या गोड बोलण्याला मी फसणार नाही, सारे पुरुष सारखेच असतात,
तुझ्या लाडीगोडीला मी बधणार नाही, तुझ्या थापांना भुलणार नाही
सखये, असा विचारही नको आणूस तू मनात
असं नको बोलूस, चूक केलीस तू मला ओळखण्यात
तुझं माझं नातं आहे जन्मोजन्मीचं, जन्मांतरीचं,
माझं प्रेम आहे तुझ्यावर कधीचं, तू आधीच वसली आहेस माझ्या मनात
खरंय तुझं लाडक्या, केव्हाच झालीय मी तुझ्यावर आसक्त
हा लटका राग आहे माझा, सख्या, तुझ्यावर आहे मी अनुरक्त
दुनिया काहीही म्हणो, तूच माझं मन आहेस, तूच माझं प्रेम आहेस,
तूच माझा साजन, तूच माझा मदन, तूच माझं जीवन आहेस
मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा
चिंब भिजून धुंद होण्याचा
या पावसाने मनात प्रेम जागवलंय,
पथ दाखविलाय त्याने चिरंतन प्रेमाचा
मोसम पावसाचा, ओल्या जलधारांचा
चिंब भिजून धुंद होण्याचा
या पावसाने खूप काही दिलंय आपणास,
आता समय आलाय त्याचे उतराई होण्याचा
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.09.2023-शनिवार.
=========================================