"श्रावण राजा"
आर्त झाली धरतीराणी श्रावणाच्या वियोगामध्ये
त्रासलेली गांजलेली ग्रीष्माच्या कडाक्यामध्ये
शांत शांत दुखी कष्टी झाली होती धरतीराणी
वाट राजदूताची पाहते नेत्रांमध्ये घेऊन पाणी
पूर्वपहाटे एका दिवशी आले ते आभाळ भरून
आले मेघदूत संगे राजाची खबर घेऊन
गोड ती खबर ऐकून राणी प्रसन्न जाहली
वेड्या तिच्या आनंदाला सीमा नाही राहिली
नटली सजली निसर्गाचा हिरवागार शालू नेसून
श्रावणाच्या आरतीसाठी तबके आणि आरत्या घेऊन
सरली घडी प्रतिक्षेची आला राजा श्रावण
सुखसमृद्धी धनसंपत्ती संगे आपल्या घेऊन
-स्वप्नील वायचळ
Edited..
Bhari ahe...