Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: सूर्य on December 16, 2010, 09:27:04 PM

Title: .. आजचे दिवस ..
Post by: सूर्य on December 16, 2010, 09:27:04 PM
माझे राहत नाहित आजचे दिवस..!
येता जाता पुसतात आजचे दिवस...!!

कसा दुरावलो
तिच्या मनातून
का हरवलो ?
ह्या ह्रुदयातुन
पळताळत राहतो
मागचे दिवस ..!!

असा एकांती
पडून राहतो
थेंब डोळ्यातला
गळुन राहतो
आठवतात मग
सोन्याचे दिवस ..!!

(कधी अचानक )
उमटून जाते
नवे पावूल
हृदयाला होते
हृदयाची चाहुल
येणार असतात मग
पारावरचे दिवस..!!


सूर्य..