Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Atul Kaviraje on October 31, 2024, 08:48:28 PM

Title: जवळजवळ वर्षाने तू मला भेटणार, दीपावली आई
Post by: Atul Kaviraje on October 31, 2024, 08:48:28 PM
"जवळजवळ वर्षाने तू मला भेटणार, दीपावली आई,
म्हणून तर तुझ्या स्वागताची चाललीय बघ घाई !"

जवळजवळ वर्षाने तू मला भेटणार,
दीपावली आई,
म्हणून तर तुझ्या स्वागताची,
चाललीय बघ घाई !

आई, मला भेटण्या तू आलीस
माझा नाहीय बसत यावर विश्वास
ते दिवे, तो लखलख प्रकाश,
संपूर्ण घरात आहे, आज तुझाच वास.

फटाक्यांचा उजाळा, चित्ताकर्षक रंग
तुझ्या उपस्थितीत, उभारून येतात मन-रंग
आई, तू आहेस खास, तुझा उत्सवही खास,
बांधून प्रेमाच्या बंधनात, कर माझ्या घरी निवास.
 
सर्वत्र शुद्धता, सात्त्विकतेचा झरा
तुझ्या पावलांनी सजलेला सारा
तू आलीस की होतो हर्षोल्हास,
प्रिय आहे मजला तुझा पदन्यास.

मातीचा दिवा, तेजाने उजळतो
प्रकाश तयाचा, भान माझे हरपतो
आई, तुझी माया आहे माझ्यावर,
दिवाळी आई, वर्षव प्रकाश माझ्या घरावर !

--अतुल परब
--दिनांक-31.10.2024-गुरुवार.
===========================================