///// वेडा /////
नखशिखांत लता हि भिजते,
नवसाज धरेला चढतो,
शिरशिरी अंगावर येते,
जेव्हा वात तनाला भिडते.....
जेव्हा मेघ दाटून येतो,
जो तो हळहळतो,
पण त्याच दुनियेतील वेडा,
विरही, गीत प्रीतीचे गातो........
ते गीत प्रीतीचे त्यांच्या,
आहे जीवनाची कथा,
शब्दात आपुल्या तो,
सांगे जीवन व्यथा.........
ना भीती त्याला वाऱ्याची,
ना भीती पावसाची,
डोळ्यांत धगधगते त्याच्या,
ती आग विरहाची ...........
कुणी तोडले त्याचे,
जे मन मुलायम होते,
आठवून आठवणींना,
जे गीत तया मुखी येते..........
///// दिगंबर /////
ते गीत प्रीतीचे त्यांच्या,
आहे जीवनाची कथा,
शब्दात आपुल्या तो,
सांगे जीवन व्यथा.........
best one gidu.............................. 8)