चांदणप्रीती
जीवन जगण्याची उर्मी देतात
तुझ्या डोळ्यातील स्नेहज्योती
उदास मनाला तोषवितात
हास्यातून ओघळणारे मोती
जिवाचा शीण निवारतात
सुमधुर सूर तुझ्याच गीती
ताणतणाव सर्व शमवतात
शब्दातील आश्वासक शक्ती
अंधारवाटा ही उजळतात
बरसता तव चांदणप्रीती
-------------