शुभ रात्र, शुभ सोमवार.
"सॉफ्ट लाइटिंग आणि बेडसह आरामदायक बेडरूम"
रात्रीची शांती गोड मधुर हवीहवीशी
सॉफ्ट लाइटिंगमध्ये ती घालवायची
कोमल मंद प्रकाशाच्या लहरीत,
मनाला विश्राम आराम द्यायचा.
बेडवरील चादर हलकेच विस्कटलेली
कोमल उबदार कंबल, जणू शांतीचे वेष्टन
नरम मुलायम त्याची हर एक दुमड,
हृदय होतं चांगलच शांत.
सबंध बेड मखमली रेशमी
त्याच्या मऊपणात असं बुडून जावं
त्याच्या सहवासात प्रत्येक रात्री,
निद्रा येणारं असं वातावरण जपावं.
लाइटिंगची कोमल मंद झलक
खिडकीतून दिसणारे अनंत फलक
चांदणीचा प्रकाश आत येतो,
सुंदर वातावरण निर्मिती करतो.
बेडच्या काठावर उशी मुलायम
निवांत, जागेवर झोकात बसलेली
पंखा डोक्यावरला झोका घेतो,
हळूहळू निद्रेला आमंत्रण देतो.
विचारांचा धागा सुटत जातो
संध्याकाळचा प्रकाश विरत जातो
सर्व शंका दूर पळतात,
शांत झोपी जा सांगतात.
बेडवरील चादर अंगावर ओढत
चंद्रप्रकाश खिडकीतून अंगावर घेत
बेडरूममधील प्रकाश मंद होतो,
डोळ्यांना सुखकर हलकेच जोजवतो.
असा हा आरामदायक बेडरूम
वर किंग साईज मखमली बेड
लाईटिंगच्या मंद प्रकाशात हळूहळू,
रात्र सरकते धीमेधीमे अहेड.
--अतुल परब
--दिनांक-09.12.2024-सोमवार.
===========================================