काय झालं काय झालं दिलेल्या आश्वासनाच काय झालं?
आश्वासन तुम्ही दिलं होत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होत, आता सांगा आधी होत ते उत्पन्न तरी शिल्लक ठेवलत का, दिल्लीच्या सीमेवर जगाचा पोशिंदा असणारे ७०० शेतकरी आतंकवादी म्हणून मारलेत का?
आश्वासन तुम्ही दिलं होतं शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार होता,आता सांगा तुमच्या ८-१० उद्योगपती मित्रांची तुम्ही हजारो कोटींची कर्जी माफ केली त्यांची गहू ज्वारी तांदूळ मक्याची शेती होती का?
आश्वासन तुम्ही दिलं होतं काळधन परत आणल जाणार होत,आता सांगा फसलेली नोटबंदी करून सर्वसामान्य जनता चोर होती म्हणून मारलीत का, दहा वर्षात नाही आले ते १५ लाख तरी खात्यात जमा होणार का?
आश्वासन तुम्ही दिलं होतं गॅस सिलेंडर स्वस्त होणार होता, आता सांगा चारशे रुपेयात मिळणारा सिलेंडर १२०० रुपये केलात, सबसिडी कुठे जमा होते हे सुद्धा माहीत नाही लोकांना तुम्हाला तरी हे पटतंय का?
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
आश्वासन तुम्ही दिलं होतं वर्षाला २कोटी नोकऱ्या देणार होतात, आता सांगा नोकऱ्यांचा खच लागलाय पण पोरच कौशल्य शून्य आहेत म्हणून पसरवत सुटलाय, कमीत कमी पोरांना बेरोजगारी भत्ते तरी देणार का?
आश्वासन तुम्ही दिलं होतं देशाची सुरक्षा वाढवणार होता, आता सांगा मग पुलवामा मधी आरडीएक्स कस अन् कुठून आल होत हे सांगायची तसदी घेणार का?
आश्वासन तुम्ही दिलं होतं चीन, पाकिस्तान बांगलादेश आपल्याला भिणार होता,आता सांगा तिकडे लडाख जवळ चीन नी भारतीय सीमेच्या आत अख्खच्या अख्खं गाव वसवल ना - बांगलादेश ला १११ गाव आंदण म्हणून दिलीत का?
आश्वासन तुम्ही दिलं होत नारी सशक्ती करणाच,आता सांगा नेत्यांकडून नेत्यांच्या मुलांकडून ते मुलांकडून तुमच्या राज्यपालांकडून स्त्रियांवर बलात्कार होतायेत हे तरी इमानदारी दाखवून मान्य करणार का?
आश्वासन तुम्ही दिलं होत सर्व समाजांच्या सर्वांगीण विकासाच,आता सांगा सर्व लोक पूर्णपणे विकसित व्हावे म्हणून हिंदू मुस्लिम भांडणे लावताय का?
आश्वासन तुम्ही दिलं होत भ्रष्टाचार मुक्त भरताच, आता सांगा सत्ताधारी भ्रष्ट आहेत म्हणून तुम्ही सत्तेत बसलात सत्तेत आल्या वर भ्रष्ट नेत्यांनाच तुमच्या पक्षात घेवून पदधारी नेते ते संत महात्म होते म्हणून केलत का?
आम्हा जनतेला उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात, १० वर्ष झाले गप्प आहात आता तरी बोलते होणार का?
तुम्हीच दिलेल्या आश्वासनाच काय झालं तुम्हाला तरी ठावठिकाणा लागतोय का?
writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram for awesome posts @K.rushi_bhaijaan