ओम साई
मंत्रीरूपी जातीभेदाची कीड
अजून किती दिवस चालणार हि जाती भेदाची साथ,
कधी खरे मानव बनून पुढे कराल मैत्रीचे हाथ,
ज्या गोष्टींनी काहीच नाही निष्पन्न,तिचीच का हर तोंडी बात,
एक तोंड चूप राहिलं तर,चूप राहतील तोंडं सात,
खोटा जात अहंकार,जो मानवतेवर सदैव करतो घात,
मानवता धर्म जागृतावून,का कोणी करत नाही यावर मात;
सुवर्ण भूमी हि मुळातच जिची निर्मिती, तत्वाशील प्रज्ञात,
मग का राहावं इथल्या हर मानवानी,शैक्षणिक रित्या अज्ञात;
जाती भेद डंखावतात मंत्री, ज्यांची विषारी सर्पाची जात,
का कोणी उतरवत नाही,यांची जाती अहंकाराची कात;
आज जे माजून उसने मंत्री पद मिरवताहेत भ्रष्टाचारी तोर्यात,
तेच ओल्या मांजरी सारखे गुलाम बनले आहेत,अडकून अंडरवर्ल्डच्या भोर्यात;
दिवसा पांढर्या शुभ्र कपड्यातले बगळे हे,रात्री कावळे बनून थैमानतात वैभिचारी गळ्यात,
दारू मिळण्यासाठी बार बालांचा खून करणारे यांचे औलाद,जोपासले जातात जसे गुलाबफुल मळ्यात;
आज भ्रष्टाचारी मंत्री जे फुगलेत,आमच्याच पैशाचे अन्न खात,
उद्या सरळ होतील जेव्हां पडेल जबरदस्त जनतेची लाथ;
हेच खरे वाळवी जे पोखारतायेत,लोकांचे दिवस आणि रात,
मूल्य जपाची खोटी शपथ घेऊन,आसनाधिस्त होतात दाखवून नंगी जात;
जनतेचाच पैसा खाऊन,काळं करतात पैशाला,उघडून साखर कारखाने गावात,
निवडणुकी करिता मतं हवे म्हणून,उसन्या मार्दवी म्हणतात,काय पडलंय नावात;
उतरले जाईल ह्यांच्याच बरोबर जातीभेदाचे शत्रुत्व अजात,
पूर्ण भेदच वितळून एकावतील,विसरून धर्मीय जमात;
प्रेम,एकोप्याने नांदतील सारे,निरपेक्षित प्रेम-वर्तुळी आनंदी आनंदात,
जन,गण,मनास खरा सूर येईल तेव्हां, हर मुख स्वरेल जेव्हां राष्ट्र गीत गात;
संपवा या द्रोहींना,जे विदेशी प्रतिनिधित्व करतात,खोकल्या आवात,
हेच संपले तर,एकवटेल नादून स्वर "वंदे मातरमाचा" तावात.
चारुदत्त अघोर.(२/२/११)