आई
आई आहे ईश्वराच्या आधी
पवित्र जगाची या निर्माती
म्हणून झुकतो तिचा निर्माता
ईश्वरही तिच्या चरणावरती
आई प्रेमळ प्रतिबिंब छान
प्रेम जगाला देणारी ती
प्रेमाचीच मग शोभावी एक
छान प्रेमळच परिभाषा ती
आई आहे शब्द पहिला
बाळ नेहमी जो उच्चारतो
मायबोलीत आईच्या त्या
बोलायला तो जसा लागतो
आई जगती गुरु प्रथमच
जन्म घेणाऱ्या जीवाचा ती
म्हणून जगी सारे म्हणती
आई आहे गुरु थोर ती
आई आहे एक गोड नात
म्हणून म्हणते मला बाळ ती
जीवाचे मोल देऊन तिच्या
रक्षण माझे करते मग ती
कवी - निलेश बामणे
kaharach khup chhan aahe kavita tuzi