कधी तरी घट्ट बंद केलेली मनाची दारे अलगद उघडावीत...
धूळ बसलेल्या कडी-कोयंड्यावर हलकीशी फुंकर मारावी..
हळूच डोकावे आत...आणि विचारावे स्वतःच स्वतःला..
काय राव...ओळख आहे का नाय आपली..??
दुनियेच्या बाजारात...विकत तर घेतलं सगळं...
पण स्वतःला विकत घ्यायची किंमत नाही परवडली..??
हळूच जावे मनाच्या कोपऱ्यात...दबक्या पावलांनी...
थोडा जरी केलास आवाज...तर हरवेल सारं काही...
नाजूक तुज मन...पडलंय एकाकी...
पत्त्यांचा बंगलाच बांधलाय जणू...वापरून आठवणींच्या भिंती...
असू दे तुझ्या डोळ्यात ओलावा..अन स्पर्शामध्ये गारवा...
घे मनाला कुशीत...आणि विचार त्याला...कुठे दुखतंय-खुपतंय का रे काही...
त्यालाही जरा मोकळं वाटू दे की...मग बघ...
कितीशी दुःख त्याने आपल्या पोटात अशीच लपवलीत...
वचन दे मनाला आता ..
नाही बनू देणार तुला परत आठवणींचा पिंजरा...
कितीहि येऊ देत डोंगर दुःखाचे ...
सतत हसरा ठेवीन मनातला कोपरा...
:)
-विजय दिलवाले
Veryy NIce...
thk u..!
वचन दे मनाला आता ..
नाही बनू देणार तुला परत आठवणींचा पिंजरा...
कितीहि येऊ देत डोंगर दुःखाचे ...
सतत हसरा ठेवीन मनातला कोपरा...
khup aavadali kavita
chhan!
hya oli khup avadalya :)

dhanyvad..!