मी तिचा विचार करतो
ती जोडली जाते
शक्तीपातलेलं शरीर
आणि कातडीमध्येखाली वीजवीज विजेचं शहर
ताणलं नाही,
पसरत गेलो लांबपर्यंत
जे तुझ्यापासून सुरू झालं नाही
ते तुझ्यापाशी संपलंही नाही
डोळे उघडले तेव्हा काळंशार पाणी हलत होतं
मागे वळून पाहिलं तर डोळे बंद होते
झोपेतून जागा होताना एक सावली हलली
पाठमोरेपण कायमचं
सुजीत