Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: amoul on March 18, 2011, 05:06:01 PM

Title: आपलीच मानसं अशी का वागतात
Post by: amoul on March 18, 2011, 05:06:01 PM
आपलीच मानसं आपल्याशी अशी का वागतात,
सारं काही कळणारच असतं, तरी का लपवतात.
त्यापेक्षा परकेपणा असलेला बरा............,
लपवलेल्याच दुख त्यांच्याकडना  होतं नाही,... आपल्यानकडनाच होतं.
त्यांनी परक्यासारखंच  वागायचं नेहमी वेळ आल्यावर,
आपणच आपलं जपायचं नातं.

रोज समोर भेटतात तेव्हा उगाच हसत राहतात,
काय माहित लपवतात किती काय मनात,
इतरानकडून एक दिवस उलगडतात गुपितं,
आणि मग वाटायला लागतं आपणच का जपायचं नातं.

आपल्याकडचा साधा अंकुरही साऱ्यांना कळतो,
पण त्यांना कसा काय त्यांचा बहरही लपवता येतो ?,
तेव्हा कळते  केवळ तोडता येत नाही म्हणून जपातायेत ते नातं.

नात्यात सुद्धा त्यांना परतफेडीची आस असते,
पण याला खरंतर व्यवहार असं म्हणतात,
या व्यवहारामुळेच नाती कमकुवत बनतात,
आणि आपलेपण हि तसंच कमी होत जातं.
मग कठीण असतं टिकवणं नातं.

नात्यात खरंतर मोकळीक हवी मनाची,
पण आपल्याच माणसांकडना  वाटते भीती तरी कशाची ?
याच भीतीपोटी बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात,
"वेळ येईल तेव्हा कळेल सारं" हि पळवाट असते.....
खरंतर त्यांना सारं काही लपवायचं असतं,
समजून घ्यावं तेव्हा, त्यांना जड झालंय नातं.

समोरच्याच्या आनंदात आपलाही आनंद असतोच कि,
पण कधी कधी त्यांनाच आनंद वाटायचा नसतो,
दुख कधी त्यांच्या आनंदच होतं नाही,
दुख होतं खरं लपवल्याच.............आणि,
वाईट वाटतं आपल्याच माणसांच्या गोष्टी इतरांकडून कळल्याच,
.
.
.
असो आनंद आहे त्यांच्या आनंदात,
आणि त्यांनी जरी परकं केलं तरी जपणार मी नातं,
पण कळत नाही हेच कि माझं काही चुकलं नसतांना,
आपलीच मानसं अशी का वागतात.

...अमोल
Title: Reply
Post by: प्रिया... on March 24, 2011, 09:55:58 AM
Kharay... Agadi true!
Mast ahe poem
Title: Re: आपलीच मानसं अशी का वागतात
Post by: pankaj2009 on March 25, 2011, 12:03:35 PM
Mast Kavita ahe....agdi manatle shabd samor alyasarkha vatla
Title: Re: आपलीच मानसं अशी का वागतात
Post by: sulabhasabnis@gmail.com on March 27, 2011, 11:34:10 PM
khuph awadli kawita---agadi mannsparshi-----!!!!
Title: Re: आपलीच मानसं अशी का वागतात
Post by: yogitakondekar@gmail.com on April 01, 2011, 11:57:06 AM
ho, kharach apali mans as wagalya war khup dukh hot, pan tyanch as wagayan mage kahitari karan asel na....kadachit aplya dukhi n pahanyasathi tar as karat nastil....nati asach asatat ji fakt samorchyach sukh pahatat.....kitihi dukh manat asel tari cheharya war hasu ch dakhawatat.....
Title: Re: आपलीच मानसं अशी का वागतात
Post by: PRASAD NADKARNI on October 17, 2012, 11:09:10 AM
 :-X :-X
no ans. for dis
but
thats true......
Title: Re: आपलीच मानसं अशी का वागतात
Post by: chaitali ghule on November 01, 2012, 09:28:51 AM
nakki he vyatha milichi kimulachi???
navryachi ka bykochi ???
:(