Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Virah Kavita | विरह कविता => Topic started by: niteenpund on March 19, 2011, 09:12:12 AM

Title: सहजच .......
Post by: niteenpund on March 19, 2011, 09:12:12 AM
किती सहजच बोलते ती,
किती सहजच हसते ती,
आठवण आली तर किती सहज सांगते ती.....
अशी का आहे ती "सहजच"....
किती सहज बोलते,
"विसरून जा मला!"
किती सहज बोलते ती रागाऊनही बोलताना...
पण तिचा तो "सहजच"
मला जरा अवघड जातोय "तिलाच" विसरताना..
नितीन डी. पुंड