ओम साई
"तुझ्या गावीची लहर..."
मी तर एकला तुझ्या आठवणीत उबलो,
असंख्य विचारांच्या काहुरी दबलो,
तू कुठे आहेस,काय तुझी खबर,
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
माझ्या चित्ती सुक्ल्या पानी,पडतं तुझंच पाउल,
का वेडं मन देतं,तुझ्याच येण्याची चाहूल;
वाट पाहत्या शिगेचा,झाला आता कहर,
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
काय नशीब माणसाचं,जो राहतो तुझ्या गावी,
प्रसन्न ती बाजू ज्या कडास तू,उजवी वा डावी;
काय सूर्याचे नशीब,जो बघतो तुला दर प्रहर,
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
या गाव-रोशणायीत,माझ्या मनी विरहाचा अंधार,
भैरवीच तो हर राग,असो माल्कौंस व कोमल गंधार;
पानगळीस आला वसंत,गाळून आपली बहर;
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
डूब्त्या नीरजाला बघून,तुझी लहरती ओढणी आठवि,
मंद गंधित पदारावून,प्रणय मादकता साठवि;
तुझ्या पडत्या पाऊली,उज्वल नशिबी ते शहर,
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
नशीब पाखरांचे जे, तुझ्या पडद्या-तारी बसती,
चांदणे ते अंबरी तुझ्या,खिडकीतून हसती;
उडती हवा तुझ्या गावची,विसावी घरटी मानेल तोवर;
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
चार ऋतू गेलेत,पण दवीत पानं, सुकले मनी,
पुस्तकी पानं पलटले,पण काही न शिरले ध्यानी;
तुझ्या स्मरणी,अन्नच काय जलही वाटे जहर,
गावी तुझ्या हवेची,कशी गं आहे लहर...?
चारुदत्त अघोर.(२३/३/११)