वाहणाऱ्या अश्रूंना भाषा नसते
शब्दांमध्ये मैत्री व्यक्त होत असते
प्रेम करणार कुणी मिळालंच तर
त्याची कदर करायची असते
नशीब पुन्हा पुन्हा साद घालत नसते
आयुष्य ..आयुष्य म्हणजे तरी काय
मनातल्या इच्छा मनातच राहिल्या
अन ज्या मनात नव्हत्या त्या मिळाल्या
जेव्हा माणूस बरोबर असतो तेव्हा
कुणाच्या लक्षात रहात नसते
पण जेव्हा चुकतो तेव्हा कुणी विसरत नसते
मित्रीचेही असेच असते
जेव्हा तुम्हाला कुणाची आठवण येते
तेव्हा त्यात काही विशेष नसते
पण जेव्हा आठवण येत नसते
तेव्हा ..मैत्री म्हणते ...
इथच तर चुकतं हीच इथच तर चुकतं
कविता बोडस