वाटते असाव कुणी माझ आपल
हातात हात घालून दूरवर सोबत चालणार
प्रेमाचे ते गोड शब्द कानात सांगणार
असताना एकटी मी हळूच येऊन मिठीत घेणार
शांतपणे माझ सगळ सगळ ऐकणार
कधी माझ्याशी खूप खूप बोलणार
बोलता बोलताच माझे डोळे वाचणार
नाही बोलले तरीही होकार समजून घेणार
पावसात येऊन सोबत माझ्या भिजणार
रात्रीच दिवस अन दिवसाची रात्र करणार
माझी खूप खूप काळजी घेणार
खूप खूप लाडावून मला रडवणार
पण मी रडले कि मात्र मला जवळ घेणार
कधी केली चूक कि प्रेमाने समजून सांगणार
खर प्रेम कसे असते ते जपून दाखवणार
आयुष्यही कमी पडेल असे मला वाटायला लावणार
माझ्या मनातले कडवट विचार पुसून टाकणार
खरच प्रेम असत या जगात हे मला शिकवणार
फक्त मैत्रीणच नाही तर प्रिया म्हणून मला जवळ करणार
विरघळून जावे वाटेल मला असे घट्ट मिठीत घेणार
हट्ट जरी केला मी तरी तो लाडाने पुरवणार
फक्त काही महिनेच नाही तर आयुष्यभर साथ देणार .....
वाटत नाहीच कुणी असे मला समजून घेणार
पण तरीही का का वाटते आहे कुणी माझ्या जवळच ते प्रेम करणार
--- Rani
Sundar jamli ahe kavita...
hummmm ........... chhan kalpana ahe ......... pan asa kuni tari fakt svapnatach milato ga ........ real life madhye nahi milat :'(
Real life madhe pan astat bar ka ashi manse...:-)
mazya paahanit tari ajun ali nahit 8)
khup chhan.................
Nice
Manapasun shodhal tar nakkich ashi manse bhetil.
chsan ahe.Milel asa kunitari...phakt tu olkhayla havas....to hi shodhat aselach na..
chan aahe, aani to tula milala dekhil aahe as vatat, fakt te tyala samajal nahi aahe itkach ho na. pan tu prayatn karat raha All The Best
खूपच छान...................