खून
बातमी ऐकून बसला धक्का
बारावीतल्या विध्यार्थ्याने केली आत्महत्या
कारण नव्हते शिक्षणात न मिळाले यश
हे तर होते प्रेमातील अपयश
मला माझे कळेना
हे काय वय होते प्रेम करण्याचे
आणि हे काय कारण होते
इतके सुंदर आयुष्य नष्ट करण्याचे
दुख मात्र नाही झाले
आला मात्र राग
प्रेम त्याचे सफळ नाही झाले
म्हणून का तू केलास सगळ्यांचा घात
काय करावे त्या आईने
जिचे तू जग होतास
सुरवात हि तूच होतास
आणि अंत हि तूच होतास
काय करावे त्या बाबांनी
ज्यांच्या अपूर्ण इच्छा तू होतास
त्यांचे अनेक त्याग होतास
त्यांची अनेक स्वप्ने होतास
काय करावे त्या बहिणीने
जिचा तू आधार होता
राखीत बांधलेला एक विश्वास होतास
मुलाच्या तिच्या एकुलता एक मामा होतास
आणि मित्रांचे काय
त्यांचा तर तू कोणीही नव्हतास
पण त्यांच्या हसण्यात हि तू होतास
आणि रडण्यात हि तू होतास
अरे पण तुला दिसले
फक्त आणि फक्त तुझेच प्रेम
दुर्लक्ष केलेस तू
तुझ्यावरचे इतरांचे प्रेम
आता भेटशील तू देवाला
तो हि म्हणेल तुला
केली नाहीस तू आत्महत्या
केला आहेस तू खून!!
खून आईच्या मायेचा
वडिलांच्या पितृत्वाचा
बहिणीच्या आधाराचा
आणि मित्रांच्या मैत्रीचा
सांगणे माझे फक्त एकच
प्रत्येक त्या प्रेमवीराला
प्रेम फक्त करयाला नाही
तर ओळखायला हि शिका
देवाने हे दिलेले आयुष
जगायला हि शिका
किरण कुंभार
apratim...
Chhan
Premikaranna ha changlach paath aahe.
awesome dude ........... like it very much ............. ek ek ola apratim ........ hatts off to u ........ keep writing and keep posting .....
majhe vichar aavadalyabaddal dhanyavaad :)
apratim :)
apratim.......too good.......keep it up.......:)