मध्यंतरी म्हणजे मे महिना आई ला गावाला रहा म्हंटले काही दिवस आराम म्हणून[/size]
ती इथे घरी असली की शिवनकाम करत असते म्हणून तिला हवा तसा आराम मिळत नाही.[/font]
म्हणून म्हणालो तिकडे रहा मस्त बिंदास कसला विचार करू नकोस. जसे आई तिकडे गेली काही दिवस असेच गेले
घरी हळू हळू एकटेपणा जाणवू लागला. कारण ती रोज डोळ्या समोर असते. त्यामुळे तिची इतकी सवय झाली की
जरा कुठे नजरे आड झाली की आपसूक नजर तिला शोधते. म्हणून काही दिवसांनी मला तिची उणीव जाणवू लागली
एक दिवस तर खूप गहिवरून आले, मग आईला फोन केला थोडा वेळ बोललो तेव्हा हायसे वाटले. पण मनात तिचा विरह तसाच होता
मग काय शब्द आणि भावना यांचा मिलाप झाला मनातील हितगुज शब्दात बांधून कवितेवाटे बाहेर आले. आई बद्दलच्या सगळ्यांच्या भावना सारख्या असतात म्हणून तुम्हाला ही कविता नक्कीच जवळची वाटेल [/font][/size]
(http://i56.tinypic.com/121a93a.jpg)[/font]