Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: ankush.sonavane on July 15, 2011, 12:04:23 PM

Title: एक वेगळी माझी माय पाहिली
Post by: ankush.sonavane on July 15, 2011, 12:04:23 PM
काय लिहू तिच्याबद्धल शब्द अपुरे पडतात
आठवतच ते दिवस डोळे भरून येतात.

      सोडून जाई दूर तरी भिती तिच्या मनाला
    येवून बिलगते जशी चिमणी पिलाला.

भरविला  घास स्वतः उपाशी राहूनी
दाखविला प्रकाश स्वतः मेनबत्ती बनूनी.

     केली संकटावरती मात उभी राहून पाठाशी
   येताच आश्रू डोळ्यात समजावती घेवून उराशी.

आयुष्य माझे घडवत स्वतः झिजत राहिली
सगळ्यात एक वेगळी माझी माय पाहिली.
                                          अंकुश सोनावणे
Title: Re: एक वेगळी माझी माय पाहिली
Post by: अमोल कांबळे on July 15, 2011, 02:01:05 PM
जय भीम ,  जिंकलस  मित्रा ....अप्रतिम ...
Title: Re: एक वेगळी माझी माय पाहिली
Post by: राहुल on July 15, 2011, 09:19:05 PM
फार छान आहे तुमची कविता.   
Title: Re: एक वेगळी माझी माय पाहिली
Post by: ankush.sonavane on July 18, 2011, 12:20:22 PM
thx all