तू जाण्याचे इशारे जेव्हा जाणवती,
नकळत तेव्हा माझे डोळेही पाणावती.
सहन होत नाही विचार, तुझ्याहून दूर राहण्याचा,
छंदच जडलाय जणू मला तुला रोज पाहण्याचा.
तू काढलेल्या चिमट्याची वेदनाच जाणवत नाही,
तू नसशील सोबत ही कळच खरी सोसवत नाही.
शनिवारी जातो जड पावलांनी घरी,
वाटतं कि असूच नये सुट्टी रविवारी.
सुट्टीची सकाळ मित्रांमध्ये, दुपार घरात जाते निघून.
सांज मात्र एकांतात गुपचूप जाते निजून.
अर्ध्या रात्री आठवतात न हसण्यासारखे Jokes ही ,
स्वतःवर झालेले comments जरी हसले सारे लोकही.
हसणं रुसणं बसणं बोलणं सारं काही एकाचसाठी,
Proposes किती नाकारून मन हि झुरतय तुझ्याचसाठी.
हसता हसता रडतो, रडता रडता हसतो मधेच,
प्रेम आहे हे प्रेम, वेड वैगरे नाही उगीच.
सर्व Login ID साठी तुझंच नावं Password आहे,
माझ्या वहीत मीच फिकटसा तुझंच रंग गडद आहे.
तू जाशील सोडून जग माझे, मला हा विचारच पटत नाही.
तुझ्याहून दूर राहण्याची माझ्यात हिम्मतच साठत नाही.
.........अमोल
सुट्टीची सकाळ मित्रांमध्ये, दुपार घरात जाते निघून.
सांज मात्र एकांतात गुपचूप जाते निजून.
अर्ध्या रात्री आठवतात न हसण्यासारखे Jokes ही ,
स्वतःवर झालेले comments जरी हसले सारे लोकही.
nice line tula suchatat tari kuthun