Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Gambhir Kavita => Topic started by: संदेश प्रताप on August 05, 2011, 12:51:23 AM

Title: दूरवरून येणारे हुंदक्यांचे सूर
Post by: संदेश प्रताप on August 05, 2011, 12:51:23 AM
दूरवरून येणारे हुंदक्यांचे सूर
अस्पष्ट होत गेले तेव्हा ...
तिरडी वरच्या
मुडद्याने
काळोख गच्च मिटून घेतला.
...आता
सावल्यांचे अनिर्बंध
अजस्त्र पाय,
स्वत:लाच तुडवत निघालेयत
स्मशानाच्या दिशेने ...

-श्याम प्रभू...

माझे मित्र श्याम प्रभू ह्यांची ही राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या कविता संग्रहातील ही एक कविता. दोन दिवसा पुर्वी त्यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांति लाभो ...संदेश