नुकतेच इंजीनेरीन्ग्चे रिझल्ट लागले आहेत. काय काय करण्यात वर्ष गेल कळलच नाही. अशाच एका विद्यार्थ्यांनी रिझल्ट बघून म्हटलेलं हे गीत.
श्री अरुण दाते यांच्या 'गेले ते दिन गेले' च्या चालीवर हे विडंबन काव्य
वर्ष अखेरी, बघून मार्क हे, फिरले माझे डोळे. ::)
तीन विषयी लावून केटी गेले हे वर्ष गेले.
गेले हे वर्ष गेले.
कॉलेजात ह्या डोनेशनचे
लाख भरुनी रुपैय्ये.
बाईक मजला देऊन स्प्लेंडर
बाप फेडतो हप्ते.
बाईकच्या त्या धुरी हरवूनी
बाईकच्या त्या धुरी हरवूनी
गेले हे वर्ष गेले.
कट्ट्या वरती बसून मारले
किती सिगरेटी झुरके.
मित्रां मध्ये मिळून ओढण्या
एकच थोटूक इवले.
परस्परांना दिले घेतले
परस्परांना दिले घेतले
गेले हे वर्ष गेले.
कॉलेजातले तास बुडवुनी
मॉल मध्ये ते फिरणे
संध्याकाळी क्लास बुडवुनी
डान्स बार मध्ये पडणे
अभ्यासाची वाट लावूनी
अभ्यासाची वाट लावूनी
गेले हे वर्ष गेले.
पिक्चर साठी जमवून पैसे
मैत्रिणीस फिरवणे.
पिझ्झा बर्गर खाण्या साठी
पॉकेटमनीचे पैसे.
मैत्रिणीन वरी जे उडवले
मैत्रिणीन वरी जे उडवले
गेले हे वर्ष गेले. :'(
केदार .....
Atishay Chhaan!!!!!
College Life cha perfect description!!!!!!!