:'("वेळीच ह्या मनाला..." :'(
वेळीच ह्या मनाला,
जर का मी रोखले असते..!
सोशित आजवर जे आलो,
ते कधीच सोसले नसते...!
सारिच हाव हि ह्याची,
सारेच चोचले नुसते..,
क्षण असंख्य शल्यांसारखे,
मज आज बोचले नसते...!
वेळीच ह्या मनाला,
जर का मी रोखले असते..!
भरून ऊरी ऊबारी,
आकाश गाठले नसते..,
नसतो लाचार मी इतका,
हे पंख छाटले नसते..!
वेळीच ह्या मनाला,
जर का मी रोखले असते..!
ते अगाध,अवचित मृगजळ,
मी पाहिलेच जर नसते..,
नसतो मी तहानलेला,
तृष्णार्थ भागिले असते..!
वेळीच ह्या मनाला,
जर का मी रोखले असते..!
त्या लालन तेज-रुपाला,
मन, वेडे हे फसले नसते..,
रात्रीत पौर्णिमेच्या,
मी चंद्रास गवसले नसते..!
वेळीच ह्या मनाला,
जर का मी रोखले असते..!
..........महेंद्र :'(