Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: बाळासाहेब तानवडे on October 23, 2011, 02:04:16 AM

Title: कुणीतरी आहे तिथं.......
Post by: बाळासाहेब तानवडे on October 23, 2011, 02:04:16 AM

कुणीतरी आहे तिथं.....

अमर्याद आहे ब्रम्हांड न्यारे.
करोडो ग्रह आहेत लाखो तारे.
जीवनाचे विविध पैलू मात्र धरतीवर इथं.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

जस धरतीवर छान वातावरण.
सभोवार पाणी ,प्राणवायू भरून.
जीवनाची असेल तिथं कांही वेगळी रीत.
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

वाहतो वारा , जाणवतो वारा.
पण डोळ्यांना ना दिसतो वारा.
परग्रह वासियाचं ही कांहीस असेल तसं
बाकी जग कस असेल रितं? कुणीतरी आहे तिथं.

ब्रम्हांडात पृथ्वी जणू छोटासा कण.
जर कणावर निसर्गाच एवढ ध्यान.
उरल्या जगावर निसर्गाची का नसेल प्रीत?
एवढ मात्र आहे त्रिवार सत्य, कुणीतरी आहे तिथं.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – २३/१०/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/ (http://marathikavitablt.blogspot.com/)
http://hindikavitablt.blogspot.com/ (http://hindikavitablt.blogspot.com/)
Title: Re: कुणीतरी आहे तिथं.......
Post by: केदार मेहेंदळे on October 24, 2011, 11:23:46 AM
surekh......
Title: Re: कुणीतरी आहे तिथं.......
Post by: बाळासाहेब तानवडे on October 24, 2011, 05:31:43 PM
केदार , खुप धन्यवाद...
Title: Re: कुणीतरी आहे तिथं.......
Post by: स्वप्नील वायचळ on November 08, 2011, 02:41:41 PM
wah....good thoughts
Title: Re: कुणीतरी आहे तिथं.......
Post by: बाळासाहेब तानवडे on November 08, 2011, 05:18:34 PM
Swapnil, Thanks for appreciation.