असच एकदा पावसात.....
मन व्याकूळ व्याकूळ
ओल्या चिंब पावसात
आज धारीला त्याने
तुझ्या आठवांचा साज
मन व्याकूळ व्याकूळ
कोसळे या सरींतून
असावीस तू जवळ
मना लागली हि आस
मन व्याकूळ व्याकूळ
आठवून ते दिवस
दोघे जण एक छत्री
तुही चिंब मीही चिंब
मन व्याकूळ व्याकूळ
आठवून तो क्षण
तोंडी एकही न शब्द
अन धरीलास हात
मन व्याकूळ व्याकूळ
कसे राहील जागेवर
क्षणापूर्वी होते माझे
आता तुझाच संचार
मन व्याकूळ व्याकूळ
पडे लोकांची नजर
तुही धुंद मीही धुंद
कुणाला त्यांची खबर
कुणाला त्यांची कदर...
मिथिल शिंदे..
khup sundar :)