काल एकटाच समुद्रकिनारी फिरता असताना
मी तुझे नाव त्या रेतीवर लिहिले ..
माझ्या नावासमोर ..
आणि स्तब्ध होऊन बघतच राहिलो ....!
...मस्त सूर्याची सोनेरी किरणे पडली होती त्यावर ..
मधूनच उसळून एक लाट आलीच ..
पुसू नये म्हणून जवळ जवळ अडवाच पडलो ..
पाणी नाही पुसू दिलं ते नाव .....!
थोडावेळ राहू दिलं ..आणि
नंतर हलक्या हाताने पुसून टाकलं ...
स्वतःपुरतेच मानसिक समाधान ..
आणि आनंद घेतला .....!
एकटाच होतो त्यावेळी समुद्रकिनारी ...
सगळीकडे शांतता ..
पण ..मावळता सूर्य ..
उसळणाऱ्या लाटा ..
आणि पडलेले शंख शिंपले
आणि मऊ आणि थंडगार रेती ला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले खरे
त्यांचे एक बरे होते
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...!
एकदम हवेत तरंगत होतो त्या रात्री ..
घरी येऊन लताची रोमांटीक गाणी ऐकली ...
किती उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
त्या रात्री ....
एक पत्र लिहिलं तुला एकांतात..
झोपच नाही लागली त्या रात्री ....!
अजूनही तसंच आहे ते पत्र ..
वाचतो अधूनमधून तुझ्या आठवणीत ..
पण आता ते जीर्ण झालाय वाचून वाचून ..
अगदी तुझ्या-माझ्या सारखं....!
सर्व काही अजूनही आठवतंय ..
अगदी काल घडल्या सारखं ..
तुला आठवायचे काहीच कारण नाही ...
कारण यातले तर तुला काहीच ठाऊक नाही ....!
good one ...
रेतीवर कशाले नाव लिवलं बावा ? रेतीवर नाव लिवून जमते का? नाव अंतरात कोरावं लागते ना राजा. बरं जाऊ दे. पत्र लिवलं एकांतात ते पाठवलं का नाई? का लिवून ठेवून देलं? काय भल्या माणसा पोरीच्या नादी लागून वाया गेला रे तू :D
8)