परतून जाल जेव्हा
परतून जाल तेव्हा पटेल ते तुम्हाला
विद्रोह जरी केला नव्हताच स्वार्थ काही
तुमचेच शब्द फसवे नव्हताच अर्थ काही
तुडवून तुम्ही गेला मृदू प्रेम भावनेला
समजावले तुम्हाला थोडे जपून वागा
तुटतो ताणल्याने नाजूक प्रेम धागा
तारुण्य हा भ्रमर हि फिरतो कडे कडेने
डंख मारुनी हा हसतो उगा दयेने
येथेच राहिलेकी भूत कल्पनेत तुमचे
गेलात तोडूनिया हे बंद नाजूक रेशमाचे
सांगावे तरी कुणाला ?गुन्हा तुम्हीच केला
भूलथाप मारुनिया तुम्ही कुस्करीले कळीला
न कळली तुम्हास जरी मन वेदनेने बोले
खुळे तू अंध बनुनी प्रेम असे कसे केले?
आत्ता नको तमाशा दावू उभ्या जगाला
अन्याय सोसण्याचा खुळे अपराध तूच केला .
मंगेश कोचरेकर
paratuni jatana mala visru nako..