Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: ankush.sonavane on January 02, 2012, 03:52:05 PM

Title: स्वप्न
Post by: ankush.sonavane on January 02, 2012, 03:52:05 PM
             स्वप्न
जिवनाच्या वाटेवरती कधीतरी तू  भेटशील
त्यावले माझ्यात काय बघशील
   आपणच होतो का ते दोघ एवढच म्हणून
   आलेल्या वाटेने तू माघारी जाशील

घाबरलेल्या मनाने माझ्याशी
हळुवार बोलायचा प्रयत्न करशील
मनात दुख असताना हि चेहऱ्यावर हसू फुलवशील
    टपोऱ्या डोळ्यात अश्रू साठवून मी
   परत जाते एवढच माझ्याशी बोलशील

तू पाहिलेले स्वप्न तुटून हे जाईल
कुठे चुकलो आपण याच विचारात गुंतून जाशील
      कळत नाही आसे का घडतं  जे नको तेच का मिळत
      नकळत मग हृदय फाटत हसऱ्या चेहऱ्यावरती अश्रू वाहत

शेवटी एक स्वप्न स्वप्नच राहत
                                                     अंकुश सोनावणे
Title: Re: स्वप्न
Post by: sindu.sonwane on January 05, 2012, 01:58:19 PM
i like this line जिवनाच्या वाटेवरती कधीतरी तू  भेटशील
त्यावले माझ्यात काय बघशील
   आपणच होतो का ते दोघ एवढच म्हणून
   आलेल्या वाटेने तू माघारी जाशील