यातनांनी दिला त्रास होता खरा
आसवांनी भिजावी जशी ही धरा
प्रेम खोटे कधी प्रेम होते खरे
वाहती येथले पुण्य पापी झरे
सारखी ही तुझी याद येते मना
मुक्त केले जरी तू मला बंधना
झाड गाते नदीच्या किनारी असे
प्रेम माझे दिवाने तिथेही वसे
बोललो मी मनाला कसे प्रेम हे
भेट झाली न होती तरी मागते
दूर जाताच तू टोचते ही कळा
न कळावे तसे दाटतो हा गळा
ज्ञानदीप सागर ...