तू एकटा नाहीस आयुष्याच्या वाटेवरती
मी आभाळातून तुझ्या सभोवती ......
वाहते वाऱ्यासवे श्वास तुझा होऊनी
दरवळते फुलात सुगंध होऊनी
बोलते कानी मधुर गीत होऊनी
डोळ्यात तुझ्या राहते एक स्वप्न बनुनी
तुझ्यासाठी सुखाची हिरवळ पसरुनी
ठेऊन हात मनावरती बघ हृदय माझे भेटते का ........
बघ तुझ्या प्रत्येक शब्दात मन माझे बोलते का ......
देवयानी .........
Ahhhhhh... Khallas.....
what n expression.... with lots of emotions..... :)