ह्या दिवसाची वाट पहिली होती..
मनापासून वाटलेलं कुठेतरी खपावं,,
आणि असं झिजलेलो सुद्धा...
दुनिया बघायची होती,
पंख पसरायचे होते,
८ तास.. ८ तास उभे राहून..,
ह्याचे त्याचे टोमणे खाऊन,
भल्या पहाटे ऐन सुट्टीत..
मिचमिचे डोळे करून,,
थंडीत वाट पहिली होती,
कारखान्याच्या गाडीची..
कामाची भीती न्हवती,
पैशाची हाव न्हवती,
आस होती दुनिया बघायची..
महिन्याच्या शेवटी,
सुट्टी वाया गेलेली..
पण हातात होते २ हजार...
भरभरून पावलेले..
आजच्या २० हजाराला ती चव नाही...
आज टोमणेही नाहीत,
आज पहाटे उठायचेही नाही,,
आज गाडी दारात उभी आहे,
पण नव्या कोऱ्या वाटलेल्या त्या दुनियेची,
आज मला आस नाही...
- रोहित
hum.......
hi