Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: केदार मेहेंदळे on January 23, 2012, 01:27:23 PM

Title: तू.....
Post by: केदार मेहेंदळे on January 23, 2012, 01:27:23 PM
 
तुझ्या नाजूक स्पर्शानी
वार्याच्या प्रत्येक झुळ्कीतून
मला रोमांचित करणारी
तू....

तुझ्या मादक गांधानी
हसणार्या प्रत्येक फुलातून
मला फुलवणारी
तू....

तुझ्या अवखळ लीलांनी
हलणार्या प्रत्येक पानातून
मला भुरळ पडणारी
तू....

तुझ्या बरसणार्या प्रेमधारेत
कोसळणार्या प्रत्येक सरीतून
मला चिंब भिजवणारी
तू....

तुझ्या निकट सहवासानी
सरणार्या प्रत्येक क्षणी
मला सुखवणारी
तू...



केदार...
Title: Re: तू.....
Post by: MK ADMIN on January 23, 2012, 11:50:49 PM
Kavita vachun Sonu Nigam chya "Tu" song chi athavan zali :)
Title: Re: तू.....
Post by: bhanudas waskar on February 10, 2012, 11:10:09 AM
sunder