गोगलगाय गोगलगाय....
गोगलगाय गोगलगाय
हळुहळु चालली बाय
गोगलगाय गोगलगाय
दोन शिंगे पोटात पाय
शंख काय तुझे घर
फिरतेस घेऊन पाठीवर
हात लावताच थोडा जरी
लाजून शंखात शिरते स्वारी
खाऊ तुझा छान छान
हिरवेगार पान न पान
एवढा कसला नट्टापट्टा
चमचमता माग ठेवता....
- पुरंदरे शशांक.
;D ;D ;)
khup chan...