झाकोळला चंद्र माझा
आठवणींच्या मेघाने
विरहाचा क्षण सरे
जसा मुंगीच्या वेगाने
पुनवेच्या रुपाला का
शाप अवसेचा देवा
मान्गल्ल्याचा दीप असा
सावलीने का गिळIवा
चंदनाच्या परी देई
सदा शीतल प्रकाश
त्याच्या चंचंल रथास
खुले राहू दे आकाश
कवी -- संजय माने
श्रीवर्धन
u can also visit me at www.abhinavkalamanch.blogspot.com
पुनवेच्या रुपाला का
शाप अवसेचा देवा
मान्गल्ल्याचा दीप असा
सावलीने का गिळIवा
sundar.......... :) :) :)
kiti sundar lihiliy re.....kharach..mi hi kavita mazya mitrane post keleli baghitli ani shodhli...tar ithe sapadli khup apratim ahe rachna