माझी पहिली कवीता-
------------------------------------
साद तुझी
______________________________
साद तुझी प्रीतीला
आज हवी होती ...
रात तुझी साथीला
आज हवी होती ...
तगमगता दीप मी
तू तेजाळ मशाल
ज्योत तुझी वातीला
आज हवी होती ...
जगण्याचे ऋण हे
फिटता श्रमलो मी
खैरात तुझी रातीला
आज हवी होती ...
बीज ते सृजनाचे
मनी कसे रुजेना
ओल तुझी मातीला
आज हवी होती ...
छेडीता ते सूर तू
आस मनी जागते
साद तूझी प्रीतीला
आज हवी होती...
___________
(गिरीश देशमुख)
khup chan kavita.... ani shabd rachana suddha chan aahet.
धन्यवाद केदार!
सर्व मित्रांना आवाहन आहे की कृपया प्रतिसाद द्या !